लालजीपाडा जंक्शन येथे नवीन पादचारी पूल, पालिका साडेपाच कोटी रुपये खर्चणार

पात्र कंत्राटदाराला पावसाळ्यासह १८ महिन्यात काम पूर्ण करणे गरजेचे आहे
लालजीपाडा जंक्शन येथे नवीन पादचारी पूल, पालिका साडेपाच कोटी रुपये खर्चणार

मुंबई : कांदिवली पश्चिम लालजीपाडा जंक्शन येथे नवीन पादचारी पूल बांधण्याचा निर्णय पालिकेच्या पूल विभागाने घेतला आहे. या पुलामुळे लिंक रोड लालजीपाडा जंक्शन येथील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ५ कोटी ६८ लाख ८५ हजार ५८९ रुपये खर्चणार आहे.

कांदिवली पश्चिम नवीन लिंक रोड लालजीपाडा जंक्शन येथे रस्ता ओलांडताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी पादचारी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी लावून धरली होती. अखेर लालजीपाडा जंक्शन येथे नवीन पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून, पात्र कंत्राटदाराला पावसाळ्यासह १८ महिन्यात काम पूर्ण करणे गरजेचे आहे.

ई-निविदा मागवल्या

कांदिवली पश्चिम येथील लालजीपाडा जंक्शन येथे नवीन पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी संस्था, प्रोप्रायटरी, भागिदारी संस्था, खासगी मर्यादित कंपनी, सार्वजनिक मर्यादित कंपनी, भारतीय कंपनी अधिनियम २०१३ अन्वये नोंदणीकृत कंपनी, बृहन्मुंबई महापालिकेकडे (एमसीजीएम) नवीन नोंदणीप्रमाणे वर्ग आणि वरील नोंदलेले कंत्राटदार (ज्यांचे नाव काळ्या यादीत नोंदविले आहे किंवा ज्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे, अश्यांना वगळून) किंवा केंद्र किंवा राज्य शासन, निम शासकीय संस्था, केंद्र किंवा राज्य सार्वजनिक क्षेत्र उपक्रम येथे समतुल्य किंवा अधिक कामाचे अनुभवी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी ई-निविदा मागवण्यात आल्या आहेत.

अन्यथा सुरक्षा रक्कम जप्त करणार!

जे कंत्राटदार पालिकेकडे नोंदणीकृत नसतील त्यांनी कंत्राट मिळाल्यावर तीन महिन्यांच्या कालावधीत नोंदणीसाठी अर्ज करावा, अन्यथा त्यांची निविदा सुरक्षा रक्कम म्हणजे इसारा (इरठे) जप्त केली जाईल, कंत्राटामधून ०.१ टक्के दंड किंवा रु. १०००० वसूल केला जाईल, जो अधिक असेल तो, संबंधित विभागाद्वारे कंत्राटदाराची प्रदान रक्कम / बीलमधून वसूल / वजा केली जाईल. बीएमसीच्या स्थापत्य/यांत्रिक व विद्युत विभागांकडे नोंदणी करण्यात अयशस्वी कंत्राटदाराचा विचार त्या विभागातील भविष्यातील बीएमसी कामांसाठी केला जाणार नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in