मुंबईतील फेरीवाल्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच नवे धोरण - केसरकर

मुंबईतील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात भाजप आमदार अमित साटम यांनी गुरुवारी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती.
मुंबईतील फेरीवाल्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच नवे धोरण - केसरकर
Published on

मुंबईतील फेरीवाल्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी फेरीवाला धोरणावरील स्थगिती लवकरच उठविण्यात येणार आहे. याबाबतचे नवे धोरण ठरविण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत केली. पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसनासाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असे केसरकर यांनी यावेळी जाहीर केले.

मुंबईतील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात भाजप आमदार अमित साटम यांनी गुरुवारी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना दीपक केसरकर यांनी वरील माहिती दिली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील फेरीवाल्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, यासाठी धोरण राबविण्याची सूचना केली. याबाबत दिलेल्या उत्तरानुसार महानगरपालिकेच्या २४ विभागीय कार्यालयामार्फत जुलै २०१४ मध्ये फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यांची संख्या १ लाख २८ हजार ४४३ इतकी आहे. त्यापैकी एकूण ९९ हजार ४३५ फेरीवाऱ्यांनी अर्ज जमा केले असून एकूण १५ हजार ३६१ फेरीवाले हे २०१७ च्या योजनांसाठी पात्र ठरत असल्याची माहिती केसरकर यांनी दिली. तर परिमंडळीय नगर फेरीवाले आणि मुख्य नगर फेरीवाले समितीमार्फत विभाग पातळीवर प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचना यांची पडताळणी करुन झाल्यानंतर ४०४ रस्त्यांवर एकूण ३० हजार ८३२ फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

logo
marathi.freepressjournal.in