आता 'महारेरा'चे नवीन पोर्टल; ‘महारेरा क्रिती’मध्ये आले नवीन फिचर्स; कधीपासून होणार सुरू?

बिल्डर व घर खरेदीच्या संपूर्ण प्रक्रियेचे सुसूत्रीकरण करण्याच्या हेतूने ‘महारेरा’चे नवे पोर्टल ‘महारेरा क्रिती’ पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे.
आता 'महारेरा'चे नवीन पोर्टल;  ‘महारेरा क्रिती’मध्ये आले नवीन फिचर्स; कधीपासून होणार सुरू?

मुंबई : बिल्डर व घर खरेदीच्या संपूर्ण प्रक्रियेचे सुसूत्रीकरण करण्याच्या हेतूने ‘महारेरा’चे नवे पोर्टल ‘महारेरा क्रिती’ पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे.

‘महारेरा’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘महारेरा-क्रिती’ हे पोर्टल फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होईल. मालमत्ता बाजारातील बदलती परिस्थिती पाहून वेबसाइटमध्ये नवीन फिचर्स जोडण्यात आले आहेत. नवीन वेबसाइट ही वापरकर्त्यांना अधिक सोयीची आहे. त्यात अनेक फिचर्स जोडले आहेत. ते बिल्डर व घर खरेदीदारांना अधिक सोयीचे आहेत.

या वेबसाइटवर ‘प्रकल्पाची स्थिती’ या भागात प्रकल्पाची पूर्ण माहिती दिली जाणार आहे. तसेच त्यात तक्रार करणे सहजसोपे बनणार आहे, तर बिल्डरला संवैधानिक माहितीसाठी आवश्यक असलेला फॉर्म, १, २, ३ व ५ देणे सोपे बनले आहे. सध्या नवीन पोर्टलचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्याची वेबसाइट काही दिवस बंद राहणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in