नवा व्हेरिएंट मुंबईच्या वेशीवर ठाण्यात ‘एक्सबीबी’च्या दोन रुग्णांची नोंद, राज्यात १८ रुग्ण

जनुकीय रचनेमध्ये बदल होत राहणे हा विषाणूच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा एक भाग असून त्यामुळे घाबरुन न जाता कोविडसंदर्भात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन
नवा व्हेरिएंट मुंबईच्या वेशीवर ठाण्यात ‘एक्सबीबी’च्या दोन रुग्णांची नोंद, राज्यात १८ रुग्ण

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असतानाच कोरोनाचा उपप्रकार ‘एक्सबीबी’चा धोका वाढला आहे. राज्यात ‘एक्सबीबी’चे १८ रुग्ण आढळले असून पुण्यात १३, नागपूर येथे दोन, अकोला येथे एक तर मुंबईपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाण्यात ‘एक्सबीबी’चे दोन रुग्ण आढळल्याने हा नवा व्हेरिएंट मुंबईच्या वेशीवर धडकला आहे. दरम्यान, पुण्यातच ‘बीक्यू.१’ आणि ‘बीए.२.३.२०’ या व्हेरियंटचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

राज्यातील ‘इन्साकॉग’ प्रयोगशाळांच्या ताज्या अहवालानुसार, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये राज्यात ‘एक्सबीबी’ या व्हेरिएंटचे एकूण १८ रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण २४ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर २०२२ या कालावधीतील आहेत. या सर्व रुग्णांची साथरोग शास्त्रीय माहिती घेण्यात येत असून प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे सर्व रुग्ण सौम्य स्वरूपाचे आहेत. या २० पैकी १५ जणांचे लसीकरण झालेले असून पाच जणांची माहिती गोळा करण्यात येत आहे. पुण्यातील ‘बीक्यू.१’ रुग्ण सौम्य स्वरूपाचा असून त्याचा अमेरिका प्रवासाचा इतिहास आहे.

जनुकीय रचनेमध्ये बदल होत राहणे हा विषाणूच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा एक भाग असून त्यामुळे घाबरुन न जाता कोविडसंदर्भात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in