कोलकातापुढे लखनऊचा कर्णधार के. एल. राहुलला आवर घालण्याचे आव्हान

कोलकातापुढे लखनऊचा कर्णधार के. एल. राहुलला आवर घालण्याचे आव्हान

आयपीएल २०२२ च्या डबल हेडरमध्ये शनिवारी पुण्यातील स्टेडियमवर होण्याऱ्या दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स एकमेकांपुढे उभे ठाकणार आहेत. कोलकातापुढे लखनऊचा कर्णधार के. एल. राहुलला आवर घालण्याचे आव्हान असणार आहे.

राहुलच्या नेतत्त्वाखालील लखनऊ सुपर जायंट्स प्लेऑफमधील आपले स्थान सुरक्षित करण्याच्या अगदी निकट येऊन ठेपला आहे. कोलकाताला प्ले ऑफ फेरीच्या आशा पल्लवित ठेवायच्या असतील, या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. त्यासाठी सलामीवीरांना अधिक दक्षतेने फलंदाजी करावी लागेल. कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने यंदाच्या हंगामात तीनशेपेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

लखनऊने राहुलच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत १० सामन्यांपैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे. चौदा गुणांसह हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकात्याने दहापैकी चार सामने जिंकले आहेत. आठ गुण मिळवून हा संघ आठव्या स्थानावर आहे.

लखनऊचे अन्य फलंदाज क्विंटन डिकॉक, आयुष बडोनी, दीपक हुडा आणि कृणाल पंड्या यांना अधिक जबाबदारीने खेळ करावा लागेल. त्याचबरोबर अष्टपैलू मार्कस स्टोइनिस आणि जेसन होल्डर यांची कामगिरीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

कोलकाताच्या संघात फिरकी गोलंदाज अनुकुल रॉयने गेल्या सामन्यात चांगली कामगिरी केल्याने तो संघात कायम राहण्याची शक्यता आहे.

प्रतिस्पर्धी संघ

कोलकाता नाइट रायडर्स: श्रेयस अय्यर (sJ'Rkj) एरोन फिंच, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नीतीश राणा, प्रथम सिंह, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, अशोक शर्मा, पॅट कमिंस, रसिख डार, शिवम मावी, टिम साउदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसेल, अनुकूल रॉय, चमिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्स, शेल्डन जॅक्सन.

लखनऊ सुपर जायंट्स: के. एल. राहुल (कर्णधार), मनन वोहरा, एविन लुईस, मनीष पांडे, क्विंटन डिकॉक, रवि बिश्नोई, दुष्मंथा चमीरा, शाहबाज नदीम, मोहसिन खान, मयंक यादव, अंकित राजपूत, अवेश खान, एंड्रयू टाय, मार्कस स्टोइनिस, काइल मेयर्स, करण शर्मा, कृष्णप्पा गौतम, आयुष बडोनी, दीपक हुडा, क्रुणाल पंड्या, जेसन होल्डर.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in