टोलनाक्यांवर दिव्यांगांसाठी अडथळाहीन स्वच्छतागृहे; स्वच्छतेचे नवे निकष, NHAI चा पुढाकार

राष्ट्रीय महामार्गांवर स्वच्छता, प्रवाशांची सोय आणि सेवांचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) देशाभरातील टोलनाक्यांवर जागतिक दर्जाच्या सार्वजनिक शौचालय सुविधा विकसित करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यात अपंगांसाठी अडथळाहीन स्वच्छतागृहे असतील.
टोलनाक्यांवर दिव्यांगांसाठी अडथळाहीन स्वच्छतागृहे; स्वच्छतेचे नवे निकष, NHAI चा पुढाकार
टोलनाक्यांवर दिव्यांगांसाठी अडथळाहीन स्वच्छतागृहे; स्वच्छतेचे नवे निकष, NHAI चा पुढाकार'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर स्वच्छता, प्रवाशांची सोय आणि सेवांचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) देशाभरातील टोलनाक्यांवर जागतिक दर्जाच्या सार्वजनिक शौचालय सुविधा विकसित करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यात अपंगांसाठी अडथळाहीन स्वच्छतागृहे असतील.

यासाठी तंत्रज्ञान आधारित देखभाल आराखडा तयार करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत ‘एनएचएआय’ विद्यमान स्वच्छतागृहांचे नूतनीकरण करणार असून स्वदेशी व प्रमाणित आराखड्यांचा वापर करून नवीन सुविधांची उभारणी करेल. महामार्ग वापरकर्त्यांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या नवीन रचनेत टिकाऊ संरचना, शाश्वत पद्धती आणि समान गुणवत्ता मानकांचा समावेश असेल, असे प्राधिकरणाने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हायब्रिड परफॉर्मन्स-बेस्ड कंत्राट पद्धत लागू करण्यात आली आहे. यानुसार, कंत्राटदार संस्थांना केवळ सुविधा चालवण्याचीच नाही, तर दीर्घकाळासाठी निश्चित केलेल्या सेवा मानकांची देखभाल करण्याची जबाबदारीही पार पाडावी लागेल. उत्तरदायित्व वाढवण्यासाठी इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आधारित थेट टेलिमेट्री प्रणाली तैनात करणार आहे. या डिजिटल देखरेख यंत्रणेमुळे रिअल-टाईम मॉनिटरिंग शक्य होऊन वेळेवर देखभाल करणे सोपे होईल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in