सव्वाकोटीच्या कोकेनसह नायजेरियन नागरिकाला अटक; वांद्रे युनिटच्या एएनसीची धडक कारवाई

अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी रात्री वांद्रे युनिटचे अधिकारी अंधेरी परिसरात गस्त घालत होते.
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक

मुंबई : सुमारे सव्वाकोटीच्या कोकेनसह एका नायजेरियन नागरिकाला वांद्रे युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंधेरी येथून अटक केली. ओनू संडे असे या नाजेयरियन नागरिकाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी १२५ ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे कोकेन जप्त केले आहे.

अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी रात्री वांद्रे युनिटचे अधिकारी अंधेरी परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलिसांना एक विदेशी नगारिक संशयास्पदरित्या फिरताना दिसून आला. पोलिसांना पाहताच तो पळू लागल्याने पथकाने त्याचा पाठलाग केला. काही अंतर गेल्यानंतर त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना १२५ ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे सव्वाकोटी रुपये इतकी आहे. गेल्या चार वर्षांपासून ओनू संडे हा नालासोपारा येथे वास्तव्यास होता.

logo
marathi.freepressjournal.in