मध्य रेल्वेवर २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान रात्रकालीन ब्लॉक; काही रेल्वे अंशत: रद्द; काही गाड्यांच्या थांब्यात बदल

लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) यार्डमधील विविध कामांसाठी मध्य रेल्वेने तीन दिवसांचा विशेष वाहतूक ब्लॉक घेतला आहे. २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत हा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्या अंशत: रद्द आणि काही रेल्वे गाड्यांच्या थांब्यात बदल केला आहे.
मध्य रेल्वेवर २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान रात्रकालीन ब्लॉक; काही रेल्वे अंशत: रद्द; काही गाड्यांच्या थांब्यात बदल
Published on

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) यार्डमधील विविध कामांसाठी मध्य रेल्वेने तीन दिवसांचा विशेष वाहतूक ब्लॉक घेतला आहे. २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत हा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्या अंशत: रद्द आणि काही रेल्वे गाड्यांच्या थांब्यात बदल केला आहे.

२६ नोव्हेंबर रोजी रात्री १२.५० ते पहाटे ५.५० वाजेपर्यंत पाच रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत चालवण्यात येतील. २५ नोव्हेंबर रोजी सुटणारी कोचुवेली-एलटीटी एक्स्प्रेस, २४ नोव्हेंबर रोजी शालीमार-एलटीटी ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, २४ नोव्हेंबर रोजी सुटणारी शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस, २४ नोव्हेंबर रोजी सुटणारी विशाखापट्टणम- एलटीटी एक्स्प्रेस आणि २४ नोव्हेंबर रोजी सुटणारी गोरखपूर-एलटीटी अतिजलद एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत चालवण्यात येईल.

२७ नोव्हेंबर रोजी रात्री १२.४० ते पहाटे ५.४० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. २५ नोव्हेंबर रोजी शालीमार-एलटीटी ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, २५ नोव्हेंबर रोजी सुटणारी शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस, २५ नोव्हेंबर रोजी सुटणारी विशाखापट्टणम-एलटीटी एक्स्प्रेस आणि २५ नोव्हेंबर रोजी सुटणारी गोरखपूर-एलटीटी अतिजलद एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत चालवण्यात येईल.

२८ नोव्हेंबर रोजी रात्री १ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी सुटणारी अयोध्या छावणी- एलटीटी एक्स्प्रेस, शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस, विशाखापट्टणम- एलटीटी एक्स्प्रेस आणि २६ नोव्हेंबर रोजी सुटणारी गोरखपूर-एलटीटी अतिजलद एक्स्प्रेस, २७ नोव्हेंबर रोजी सुटणारी बल्लारशाह-एलटीटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत चालवण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in