कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरेंचा विजय; विधान परिषद निवडणुकीतील पहिला निकाल समोर

भाजपच्या निरंजन डावखरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघात बाजी मारली आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरेंचा विजय; विधान परिषद निवडणुकीतील पहिला निकाल समोर
Published on

मुंबई: लोकसभा निवडणूकीनंतर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या विधानपरिषद निवडणूकीच्या चार जागांची मतमोजणी सुरु आहे. यामध्ये पहिला निकाल हाती आला असून भाजपच्या निरंजन डावखरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघात बाजी मारली आहे. अत्यंत चुरशीच्या आणि राज्याचं लक्ष लागलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात अखेर भाजपने बाजी मारली. कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांनी दोन फेऱ्यांतच ५८ हजार मते मिळवली आहेत. तर काँग्रेसचे रमेश कीर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. विशेष म्हणजे तिसऱ्या फेरीतील मतमोजणी अजून सुरु आहे. मात्र त्यापूर्वीच निरंजन डावखरे यांनी विजयासाठी आवश्यक मतं मिळवली आहेत.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोकण पदवीधर मतदार संघात भाजपाचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसच्या रमेश कीर यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळाली. दोन फेरीतील मतमोजणी पूर्ण झाली असून तिसऱ्या फेरीतील मतमोजणी अजून सुरु आहे. परंतु पहिल्या दोन फेरीतच निरंजन डावखरे यांना निर्णायक मतं मिळाली आहेत. दोन फेरीत सुमारे ८४ हजार मतमोजणी झाली असून यापैकी ५८ हजार मते निरंजन डावखरे यांना मिळाली आहेत. तर काँग्रेसचे रमेश कीर यांना केवळ १९ हजार मते मिळाली आहेत.

दरम्यान मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना उबाठाचे अनिल परब विजयाच्या उंबरठ्यावर असून त्यांनी मोठी आघाडी घेतली आहे. अनिल परब यांनी निवडणूक जवळपास जिंकल्यात जमा असून शिवसैनिकांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in