अटल सेतू मार्गावरून एनएमएमटीची बस धावणार; बसमार्ग क्र. ११६ आणि ११७ अशा दोन बसची सुविधा

नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन उपक्रमाच्या वतीने करण्यात आले आहे.
अटल सेतू मार्गावरून एनएमएमटीची बस धावणार; बसमार्ग क्र. ११६ आणि ११७ अशा दोन बसची सुविधा
Published on

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचे अर्थात एनएमएमटीचे वातानुकूलित अतिजलद नवीन बसमार्ग क्र.११६ नेरूळ बस स्थानक (पूर्व) ते मंत्रालय मार्गे उलवे, शिवाजीनगर टोल नाका तसेच बसमार्ग क्र.११७ खारघर से.३५ ते मंत्रालय मार्गे पनवेल, पळस्पे, गव्हाण टोल नाका अशी बससेवा अटल सेतू (MUMBAI TRANS HARBOUR LINK) या मार्गावरून १२ सप्टेंबरपासून तुर्भे आगारातून सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन उपक्रमाच्या वतीने करण्यात आले आहे.

बस क्र.११७ चा प्रवासमार्ग

खारघर से. ३५ सर्कल उत्सव चौक, स्पॅगेटी / घरकुल, कळंबोली सर्कल, आसुडगाव आगार, पनवेल एसटी बस स्थानक, भिंगारी, पळस्पेफाटा, महात्मा फुले विद्यालय / करंजाडे फाटा, गव्हाण टोलनाका, शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू मार्गे शिवडी, डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानक, वाडीबंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल / जीपीओ, गोल्डनगेट / डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, एल. आय. सी / मंत्रालय (डाऊन) या मार्गाचा समावेश आहे.

प्रवास स्थान

  • खारघर से.३५ ते मंत्रालय – ७.४०

  • मंत्रालय ते खारघर से.३५ -६.१५

या मार्गाची ठळक वैशिष्ट्ये

बस मार्ग क्रमांक ११६ वातानुकूलित

प्रवर्तन – तुर्भे आगार

प्रवासकाळ- ९५ ते १०० मिनिटे

प्रवर्तन काळ - सोमवार ते शनिवार

प्रवास भाडे – रु.२३०/-

बस मार्ग क्रमांक ११७ वातानुकूलित

प्रवर्तन – तुर्भे आगार

प्रवासकाळ- ११५ ते १०० मिनिटे

प्रवर्तनकाळ - सोमवार ते शनिवार

प्रवासभाडे - रु.२७०/-

बस क्र. ११६ चा प्रवासमार्ग

नेरूळ बसस्थानक, सागरदिप सोसायटी / शुश्रूषा हॉस्पिटल, आगरी कोळी संस्कृती भवन, से.४२ ए बस स्थानक / गायमुख चौक, नमुंमपा मुख्यालय, मोठा उलवा गाव, शगुन रियालटी चौक, बामण डोंगरी रेल्वे स्थानक, उलवे प्रभात हाईट्स, शिवाजीनगर / अटल सेतू टोल नाका, शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू मार्गे शिवडी, डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानक, वाडीबंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल / जीपीओ, गोल्डनगेट / डॉ. बाबासाहेव आंबेडकर चौक, एल.आय.सी./ मंत्रालय डाऊन असा असणार आहे.

प्रवासस्थान

नेरूळ बसस्थानक ते मंत्रालय सकाळी ७.५५

मंत्रालय ते खारकोपर रेल्वे स्थानक सकाळी ९.४५

खारकोपर रेल्वे स्थानक ते मंत्रालय सायंकाळी ५.२०

मंत्रालय ते नेरूळ बस स्थानक ६.२५

logo
marathi.freepressjournal.in