आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही ; सेव्ह आरे आणि आम आदमी पक्षाचे आंदोलन

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३ची कारशेड उभारण्याच्या कामाला सुरुवात करता यावी
आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही ; सेव्ह आरे आणि आम आदमी पक्षाचे आंदोलन

मेट्रो-३ची कारशेड उभारण्याच्या कामाला सुरुवात करता यावी, यासाठी राज्य सरकारने गुरुवारी आरेतील कामावरील बंदी उठवली. नवीन सरकारच्या या निर्णयाला पर्यावरणप्रेमी संघटनांकडून विरोध वाढत आहे. त्यामुळे यावेळी सेव्ह आरे सोबत आम आदमी पक्षानेही आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच सरकारचा हा निर्णय अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३ची कारशेड उभारण्याच्या कामाला सुरुवात करता यावी, यासाठी राज्य सरकारने गुरुवारी आरेतील कामावरील बंदी उठविली. याचा निषेध करण्याकरिता आम आदमी पार्टीने आरे येथील पिकनिक पॉइंट येथे आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने आम आदमी पार्टीचे नेते आणि पर्यावरणप्रेमींनी सहभाग नोंदवला. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in