पैसे दिल्याशिवाय मुंबई महानगरात कोणी आयुक्त होत नाही - रईस शेख

औरंगजेब याची प्रशंसा करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटत असतानाच सपा आमदार रईस शेख यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे.
 रईस शेख
रईस शेख संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : औरंगजेब याची प्रशंसा करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटत असतानाच सपा आमदार रईस शेख यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. पैसे दिल्याशिवाय मुंबई महानगरात कोणी आयुक्त होत नाही, असे विधान केले आहे. मुंबई महानगर प्रदेशाचा विकास झाल्याशिवाय महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनू शकणार नाही, असे वक्तव्य रईस शेख यांनी बुधवारी विधानसभेत केले. शेख यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटणार असल्याची चर्चा विधी मंडळ परिसरात सुरू आहे.

मुंबई महानगर प्रदेशात पैसे दिल्याशिवाय कोणीही आयुक्त बनू शकत नाही. अशा स्वरूपाचा कारभार नगर विकास विभागात आहे. जे आयुक्त आले त्यांनी विकास आराखडा बनविला त्याचा प्रादेशिक विकास आराखड्याशी कसलाही ताळमेळ नाही. फक्त दुकान थाटून बसले आहेत. अशा स्वरूपाचे जर आपण शहरे निर्माण करत असू तर महाराष्ट्राचे १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही, असे शेख यांनी यावेळी नमूद केले.

भिवंडी आणि मुंबई महानगर प्रदेशातील परदेशी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल आणि अद्ययावत अशा स्वरूपाच्या गरजेच्या पायाभूत सुविधा

उपलब्ध करून देण्याची मागणी मागील पाच वर्षांपासून करत आहे. पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे, असेही आमदार रईस शेख म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in