मुंबईकरांना विजेचे नो टेन्शन !

एक हजार मेगावॉट वीजपुरवठ्यात वाढ
मुंबईकरांना विजेचे नो टेन्शन !

मुंबई : अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड या सर्वात मोठ्या खासगी वीज कंपनीने ८,३०० कोटी रुपयांच्या (१ अब्ज डॉलर) उच्च क्षमतेच्या हरित ऊर्जा पारेषण वाहिनीसाठी व्यवहार केल्याची घोषणा केली आहे. या वित्तीय व्यवहारामुळे मुंबई शहराला अधिक नूतनीकरणक्षम वीजपुरवठा होऊन शहराच्या वाढत्या विजेच्या मागणीची पूर्तता होईल.

मुंबईत सध्या ४,००० मेगावॅट वीजपुरवठा होत असून मागणीवरून आर्थिक वर्ष २०२४-२५ पर्यंत ५ हजार मेगावॅटपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. शहरात १,८०० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता आहे. विद्यमान पारेषण क्षेत्रात वीजेची क्षमता कमी होण्यासारख्या जोखमेचा सामना करावा लागतो. ग्रीडच्या अडचणींमुळे संपूर्ण शहरात १२ ऑक्टोबर २०२० रोजी वीजपुरवठा खंडित होण्याची मोठी घटना घडली होती. उच्च क्षमतेच्या हरित ऊर्जा पारेषण वाहिनीमुळे राज्य आणि राष्ट्रीय ग्रीडसह आंतर सुविधा उपलब्ध करून ग्रिडमधील स्थिरता वृद्धिंगत होईल. या वाहिनीमुळे मोठ्या प्रमाणात शहरात अतिरिक्त १ हजार मेगावॅट नूतनीकरणक्षम उर्जेची उपलब्धता असेल. परिणामी भविष्यात अखंड वीज पुरवठा सुनिश्चित होईल.

“मुंबई शहरासाठी ही जोडणी म्हणजे काळाची गरज आहे आणि शहराच्या विकासाच्या आकांक्षांची ती पूर्तता करेल. मुंबईच्या उज्ज्वल आणि हरित भविष्यासाठी असलेली आमची बांधिलकी यातून प्रदर्शित होते. या प्रकल्पामुळे शहराच्या प्रदुषणमुक्त प्रवासाला गती मिळण्यास साहाय्य होईल,” असे एईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सरदाना म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in