उपकंत्राटदाराला नो एण्ट्री! पालिकेने मागणी फेटाळली

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.
उपकंत्राटदाराला नो एण्ट्री! पालिकेने मागणी फेटाळली

मुंबई : सिमेंट काँक्रीटच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी ६ हजार ३७३ कोटींच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. परंतु या कामांत उपकंत्राट व प्रभागनिहाय कंत्राट देण्यात यावी, अशी कंत्राटदारांची मागणी पालिका प्रशासनाने फेटाळली आहे.

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तातडीने निविदा प्रक्रिया राबवत पहिल्या टप्प्यात सहा हजार कोटींचे कंत्राट देण्यात आले. मात्र पहिल्या टप्प्यातील कामे सुरू झाली नसताना दुसऱ्या टप्प्यातील ४०० किमी अंतराचे २०० हून अधिक रस्ते कामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. मात्र दुसऱ्या टप्प्यातील कामात उपकंत्राट व प्रभागनिहाय कंत्राट देण्यात यावे अशी मागणी कंत्राटदारांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र पालिका प्रशासनाने कंत्राटदारांची मागणी फेटाळल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in