मुंबई : मध्य रेल्वेच्या सायन स्थानकातील ११० वर्षे जुना रोड ओव्हरपूल पाडून नवीन पुनर्बांधणी करणे, पाचव्या व सहाव्या लेनचे कामासाठी पूल पाडण्यात येणार आहे. या कामासाठी पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे बेस्ट परिवहन विभागाने बेस्ट बसेसच्या २३ मार्गांत बदल केला आहे. दरम्यान, पुलाची पुनर्बांधणी दोन लेनचे कामासाठी यासाठी पुढील १८ महिने पुलाचे काम सुरू राहणार आहे.
सायन पुलावरून अवजड वाहनांना बंदी घातल्याने बेस्ट बसेस चेंबूरमार्गे येणाऱ्या बसेस बीकेसी तर दक्षिण मुंबईतून येणाऱ्या बसेस सायन रुग्णालयाच्या आधीच्या सिग्नलवरून डावीकडे वळसा घेणार आहेत. बेस्ट बसेसमध्ये असा बदल करण्यात आला आहे.
असे आहेत बसमार्गांत बदल
११ मर्यादित ही बस वांद्रे वसाहत , कला नगर मार्गे टी जंक्शन येथून सुलोचना सेठी मार्गाने लोकमान्य टिळक रुग्णालयमार्गे नेव्ही नगर येथे जाईल.
बस क्रमांक १८१, २५५ म .३४८ म. ३५५ म या बस कला नगर मार्गे टी जंक्शन व सुलोचना सेठी मार्गाने लोकमान्य टिळक रुग्णालय, राणी लक्ष्मीबाई चौक मार्गे जातील.
बस क्र ए ३७६ ही राणी लक्ष्मीबाई चौकहून लोकमान्य टिळक रुग्णालय सुलोचना सेठी मार्गाने बनवारी कॅम्प, रहेजा मार्गे माहीम येथे जाईल.
सी ३०५ ही बस धारावी आगारहून पिवळा बांगला टी जंक्शन व सुलोचना सेठी मार्गाने लोकमान्य टिळक रुग्णालयहून बॅकबे आगार येथे जाईल.
बस क्र. ३५६ म, ए ३७५ व सी ५०५ या बस कला नगर बीकेसी कनेक्टरहून प्रियदर्शनी येथे जातील.
बस क्र ७ म, २२ म, २५ म व ४११ या बस महाराष्ट्र काटा, धारावी आगारहून पिवळा बांगला टी जंक्शन व सुलोचना सेठी मार्गाने लोकमान्य टिळक रुग्णालयमार्गे जातील.
बस क्र. ३१२ व ए ३४१ या बस महाराष्ट्र काटा, धारावी आगारहून पिवळा बांगला टी जंक्शन व सुलोचना सेठी मार्गाने लोकमान्य टिळक रुग्णालय, राणी लक्ष्मी चौकमार्गे जातील.
बस क्र. एसी ७२ भायंदर स्थानक ते काळाकिल्ला आगार व सी ३०२ ही बस मुलुंड बस स्थानक ते काळा किल्ला आगार येथे खंडित करण्यात येईल.
बस क्र. १७६ व ४६३ या बस काळा किल्ला आगार येथून सुटतील व शीव स्थानक ९० फूट मार्गाने लेबर कॅम्प मार्गाने दादर माटुंगा स्थानकाकडे जातील.