आरे कॉलनीतील तलावांत गणपती विसर्जन नाही; विसर्जनासाठी पर्यावरणपूरक व्यवस्था करा राज्य सरकारसह महापालिकेला हायकोर्टाचे निर्देश

गणपती विसर्जन करण्याची खबरदारी घेण्याच्या सूचना पालिका व इतर सरकारी यंत्रणांना दिल्या.
आरे कॉलनीतील तलावांत गणपती विसर्जन नाही; विसर्जनासाठी पर्यावरणपूरक व्यवस्था करा राज्य सरकारसह महापालिकेला हायकोर्टाचे निर्देश

मुंबई : पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याने आरे कॉलनीतील तलावात गणपती विसर्जन करण्यास सीईओने परवानगी नाकारल्याने यावर्षापासून आरे कॉलनीतील तलावामध्ये गणपतीचे विसर्जन करण्यास हायकोर्टाने मनाई केली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने ही मनाई करताना पर्यावरणपूरक पद्धतीने सुरक्षित गणपती विसर्जन करण्यासाठी संपूर्ण मुंबई शहर व उपनगरांत ठिकठिकाणी पुरेशा प्रमाणात मूर्ती विसर्जन व्यवस्था करा, असे निर्देश मुंबई महापालिका, राज्य सरकार तसेच इतर यंत्रणांना दिले.

आरे कॉलनीतील छोटा काश्मीर तलाव, गणेश मंदिर तलाव आणि कमल तलाव या तीन तलावांमध्ये गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यास मनाई करा, त्याबाबत पालिकेला निर्देश द्या, अशी मागणी करीत ‘वनशक्ती’ संस्थेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. मंगळवारी झालेल्या सुनावणीनंतर महापालिकेने गणपती विर्सजनाला परवानगी देण्याचा चेंडू आरे कॉलनीच्या सीईओंच्या कोर्टात ढकलल्यानंतर सीईओंनी परवानगी देण्यास नकार दिला. याची गंभीर दखल घेत खंडपीठाने र्यावरणपूरक पद्धतीने गणपती विसर्जन करण्याची खबरदारी घेण्याच्या सूचना पालिका व इतर सरकारी यंत्रणांना दिल्या.

logo
marathi.freepressjournal.in