बाण पळवले तरी धनुष्य माझ्याकडे, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा 

कितीही संकटे आली तरी संघर्ष करू, पुन्हा पक्ष नव्याने उभा करू,” असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला
बाण पळवले तरी धनुष्य माझ्याकडे, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा 

“बंडखोरांनी नव्हे, तर भाजपने शिवसेनेत फूट पाडली आहे. शिवसेनेला संपवण्याचे भाजपचे कारस्थान सुरू आहे. माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा,” असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी भाजपला दिला.“ठाकरे संकटाला घाबरत नाहीत. कितीही संकटे आली तरी संघर्ष करू, पुन्हा पक्ष नव्याने उभा करू,” असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

उत्तर भारतीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, “माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा; पण धनुष्य माझ्याकडे आहे, हे लक्षात ठेवा. शिवसेनेत फूट बंडखोरांनी पाडली नाही, तर ती भाजपने पाडली,” असा आरोप त्यांनी केला. 

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in