भविष्यात कुणी शिवसेनेच्या नादी लागण्याचा स्वप्नातही विचार करता कामा नये - उद्धव ठाकरे

मातोश्रीबाहेर नाशिकमधील शिवसेनेच्या सदस्यनोंदणी मोहिमेबाबत उद्धव ठाकरे बोलत होते
भविष्यात कुणी शिवसेनेच्या नादी लागण्याचा स्वप्नातही विचार करता कामा नये - उद्धव ठाकरे

“तुम्ही सगळे येथे जमलात. मी कुणालाही कमी लेखत नाही. आपल्याला मर्दासारखंच जिंकले पाहिजे. आपली सदस्यसंख्या आणि प्रतिज्ञापत्रांची संख्या एवढी झाली पाहिजे की, भविष्यात कुणी शिवसेनेच्या नादी लागण्याचा स्वप्नातही विचार करता कामा नये,” असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मातोश्रीबाहेर नाशिकमधील शिवसेनेच्या सदस्यनोंदणी मोहिमेबाबत उद्धव ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, “नाशिकमध्ये किमान सदस्यसंख्या एक लाखाच्या वर गेली पाहिजे. कारण, माझा भरवसा तुमच्यावर आहे. माझ्याकडे तुमच्याशिवाय दुसरे कुणी नाही. त्यांच्या यंत्रणा कामाला लागल्या आहेत. तुमची साथ मला अशी-तशी नकोय. ही गर्दी छान आहे. गर्दीचा फोटो चांगला आहे; पण तो घेऊन मी निवडणूक आयोगाकडे जाऊ शकत नाही. ते मला सदस्यसंख्या, प्रतिज्ञापत्र विचारतील. त्यामुळे मला प्रतिज्ञापत्र पाहिजेत.”

शिवसैनिकांना आवाहन करत उद्धव ठाकरे म्हणाले की, “तुम्हाला सगळ्यांना वेळ आल्यावर चांगली जबाबदारी देणार; पण आता शिवसेनेचा भगवा हातात घट्ट पकडा. शिवसैनिकाचे रक्त असणारे आपले मनगट आहे. तुमच्या हातातून भगवा खेचणे दूरच; पण भगव्याला हात लावण्याचा जरी कुणी प्रयत्न केला, तरी त्याला त्याची जागा दाखवून द्या.”

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in