पीओपीच्या मुर्तीवर यंदा बंधने नाही,मुंबई पालिकेने केले परिपत्रक प्रसिद्ध

पीओपीच्या गणेशमुर्ती असाव्यात का हा संभ्रम तूर्तास दूर झाला आहे.
पीओपीच्या मुर्तीवर यंदा बंधने नाही,मुंबई पालिकेने केले परिपत्रक प्रसिद्ध

गणेश मुर्ती शाडूच्या मातीच्या की पीओपीच्या मुर्ती हा संभ्रम यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी तूर्तास दूर झाला आहे. पीओपीच्या मुर्तीवर यंदा बंधन नसून पुढील वर्षी निर्णय घेण्यात येईल, असे परिपत्रक पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केले आहे. तर यंदाच्या गणेशोत्सवात घरगुती गणेश मुर्ती २ फुटांपर्यंत असाव्यात, असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.

पीओपीच्या गणेशमुर्ती असाव्यात का हा संभ्रम तूर्तास दूर झाला आहे. शाडूच्या मूर्तीच असाव्यात असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने २०२० मध्ये दिला होता.

तसेच उच्च न्यायालयाने पीओपीच्या मुर्तीवर बंदी असल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका यंदाच्या वर्षीपासून पीओपीवर बंदी घालण्याच्या निर्णयाप्रत आली होती. मात्र गणेशोत्सव मंडळांनी यंदा 'पीओपी'ला परवानगी द्यावी, अशी भूमिका घेतल्यानंतरही पालिकेने कोणतेही स्पष्ट निर्देश दिले नव्हते. त्यामुळे मंडळे, मूर्तीकार व बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. पालिकेने २९ जून रोजी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन होण्याच्या दृष्टीने विभाग कार्यालयांनी सन २०२३ पासून पीओपी मूर्तीवर बंदी असल्याच्या बाबीस व्यापक प्रसिद्धी द्यावी, असे म्हटले आहे. सन २०२२ करीता पीओपीच्या मूर्ती स्वखुशीने टाळून त्याऐवजी पर्यावरण पुरक साहित्याची मूर्ती खरेदी करावी असे आवाहनही पालिकेने केले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in