करवाढ नाही, मात्र वसुली; मुंबई महानगरपालिकेचे स्पष्टीकरण

आर्थिक वर्षांत मालमत्ता करवाढ केली जाणार नाही. मात्र, मालमत्ता कराची देय रक्कम वसूल करण्यात येईल, अशी माहिती मुंबई मनपाचे आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी दिली.
करवाढ नाही, मात्र वसुली; मुंबई महानगरपालिकेचे स्पष्टीकरण

मुंबई : आर्थिक वर्षांत मालमत्ता करवाढ केली जाणार नाही. मात्र, मालमत्ता कराची देय रक्कम वसूल करण्यात येईल, अशी माहिती मुंबई मनपाचे आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी दिली.

करदात्या नागरिकांना २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी पालिकेच्या देय असलेल्या मालमत्ता कराची बिले वेबसाइटवर तयार आहेत. मात्र, ती अद्याप ग्राहकांना पाठविलेली नाहीत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील आदेशानुसार मालमत्ता कर आकारणी आणि कायदेशीर अभिप्राय याचा उल्लेख मालमत्ता कर विभागाने तयार केलेल्या बिलावर नमूद केल्यामुळे करदात्या नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. मुंबईकर करदात्यांवर चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करात कोणतीही वाढ केली जाणार नाही, असे चहल यांनी स्पष्ट केले.

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वाढ होणार नाही, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, आगामी निवडणुकीनंतर ही मालमत्ता करवाढ लागू केली जाईल, अशी चर्चा पालिकेत सुरु आहे.

logo
marathi.freepressjournal.in