अंधेरी, जोगेश्वरीत सोमवारी पाणी नाही; वेरावली जलाशयाच्या वाहिनीचे काम करणार

१२ तासांच्‍या कालावधीत के-पूर्व आणि के-पश्चिम विभागातील काही परिसरांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्याचबरोबर के-पूर्व विभागातील काही परिसरांत पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
अंधेरी, जोगेश्वरीत सोमवारी पाणी नाही; वेरावली जलाशयाच्या वाहिनीचे काम करणार
Published on

मुंबई : के-पूर्व विभागात वेरावली जलाशय-२ येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या वाहिनीवरील झडपा बदलण्याचे काम सोमवारी (२ सप्टेंबर) रात्री १ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत केले जाईल. त्यामुळे या १२ तासांच्‍या कालावधीत के-पूर्व आणि के-पश्चिम विभागातील काही परिसरांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्याचबरोबर के-पूर्व विभागातील काही परिसरांत पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, के-पूर्व विभागात मजास गाव, समर्थ नगर, सर्वोदय नगर, इंदिरा नगर, जनता वसाहत, हिंद नगर, दत्त टेकडी, शिव टेकडी, प्रताप नगर, श्याम नगर, मजास बस आगार, मेघवाडी, प्रेम नगर, वांद्रे भूखंडाचा काही भाग, रोहिदास नगर, गांधी नगर, आर. आर. ठाकूर मार्ग, आनंद नगर, ओबेरॉय टॉवर, जोगेश्वरी रेल्वे स्थानक (पूर्व) ते पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यानचा परिसर, नटवर नगर, पी. पी. डायस कंपाउंड येथे पाणीपुरवठा बंद राहील.

त्याचबरोबर महाकाली मार्ग, पूनम नगर, गोनी नगर, तक्षशिला मार्ग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण वसाहत, दुर्गा नगर, पेपर बॉक्स, मालपा डोंगरी क्रमांक ३, शेर-ए-पंजाब, बिंद्रा संकुल, हंजर नगर, गणेश नगर, शोभना परिसर येथेही नियमित पाणीपुरवठा बंद राहील. सुंदर नगर, गौतम नगर, मॉर्डन बेकरी, प्रजापूरपाडा येथेही पाणीपुरवठा होणार नाही.

के-पश्चिम विभागात येथे पाणी नाही

सी. डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय मार्गिका, स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकूशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी बाजार, भर्डावाडी, नवरंग चित्रपटगृहाच्या मागे, अंधेरी गावठाण, आंब्रे उद्यान पंप व गझधर पंप, गिलबर्ट हिल (भाग), तीन नळ, गावदेवी डोंगरी मार्ग, उस्मानिया डेअरी तसेच पटेल इस्टेट, वैशाली नगर, सौराष्ट्र पटेल इस्टेट, अमृत नगर, अजीत ग्लास उद्यान, आक्सा मस्जिद मार्ग, बेहराम बाग मार्ग, गुलशन नगर, राघवेंद्र मंदिर मार्ग, रिलीफ मार्ग, हरियाणा बस्ती, देवराज चाळ, जयराज चाळ, घारवाला डेअरी, स्वामी विवेकानंद मार्ग ते जोगेश्वरी बस आगार, चार बंगला, डी. एन. नगर, जुहू वेसावे जोड रस्ता, गणेश नगर, कपासवाडी, भारत नगर, सात बंगला, आंबोळी, म्हातारपाडा, राज कुमार, आझाद नगर-१, २, ३, दत्ता साळवी मार्ग, जीवन नगर, नवीन जोड रस्ता, पंचम सोसायटी, अंधेरी औद्योगिक वसाहत, फन रिपब्लिक मार्ग, सरोटा पाडा, अपना बाजार, सहकार नगर येथे सोमवारी पाणी पुरवठा बंद राहील. याशिवाय वीरा देसाई मार्ग (भाग), कॅप्टन सामंत मार्ग, अग्रवाल वसाहत, हिल पार्क, हनुमान मंदिर मार्ग, प्रथमेश संकुल, कुरेशी कंपाऊंड, विकास नगर, क्रांती नगर, गणेश नगर, कदम नगर, काजू पाडा, आनंद नगर, आर.सी. पटेल चाळ, पारसी वसाहत, शक्ती नगर, शुक्ला वसाहत, पाटलीपुत्र ओशिवरा येथेही पाणीपुरवठा होणार नाही.

logo
marathi.freepressjournal.in