या प्रकरणामुळे राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

शिराळा न्यायदंडाधिकाऱ्यांनी २८ एप्रिल २००२ रोजी राज ठाकरे यांच्यासह १० जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते
या प्रकरणामुळे राज ठाकरे यांच्याविरोधात  अजामीनपात्र वॉरंट जारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात रेल्वे भरती आंदोलनप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले असून, ११ जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वीही त्यांच्याविरुद्ध अशीच दोन वॉरंट जारी करण्यात आली होती. गेल्या महिन्यात बीडच्या परळी जिल्हा न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. वारंवार गैरहजर राहिल्याने शिराळा न्यायदंडाधिकाऱ्यांनी २८ एप्रिल २००२ रोजी राज ठाकरे यांच्यासह १० जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. याप्रकरणी ८ जूनला सुनावणी झाली असता राज ठाकरे गैरहजर राहिले. यानंतर कोर्टाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे.

सांगली कोर्टातून हे वॉरंट जारी करण्यात आले असले तरी याआधी, सांगली कोर्टातूनच राज ठाकरेंविरोधात दुसरे अजामीनपात्र वॉरंट ६ एप्रिल रोजी जारी करण्यात आले होते. हे अजामीनपात्र वॉरंट २००८च्या एका प्रकरणात जारी करण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम १४३, १०९, ११७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in