पहिल्या दिवशी ५०० जणांना नोटीस; मराठी पाट्या न लावणाऱ्यांविरुद्ध पालिका अॅक्शन मोडमध्ये

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाईसाठी पालिका अॅक्शन मोड मध्ये आली आहे.
पहिल्या दिवशी ५०० जणांना नोटीस; मराठी पाट्या न लावणाऱ्यांविरुद्ध पालिका अॅक्शन मोडमध्ये

मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. सोमवारपासून दुकानांची तपासणी सुरु केली असता ५१२ दुकानांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाट्या न लावलेल्याचे निदर्शनास आल्याने ५१२ दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली असून आठवडाभरात मराठी पाटी न लावल्यास न्यायालयीन कारवाईला दुकानदारांना सामोरे जावे लागले, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दुकानांची तपासणी पुढील एक आठवडा सुरु राहणार असून मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाईसाठी पालिका अॅक्शन मोड मध्ये आली आहे.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२ तील कलम ३६ ‘क’ (१)च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला लागू असलेल्या कलम ७ नुसार मराठी भाषेतून ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक आहे. याबाबत पहिल्यांदा ३१ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र व्यापारी संघटनांनी कोरोनाचा फटका आणि आर्थिक कारण देत तीन वेळा मुदत वाढवून घेतली होती. ही अंतिम मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली. यादरम्यान, व्यापारी संघटनांनी पालिकेच्या कारवाईच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली. मात्र याबाबत न्यायालयाकडून पालिकेला कोणत्याही सूचना आल्या नसल्याने पालिकेने १० ऑक्टोबरपासून सर्व २४ वॉर्डांमध्ये कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in