अबू सालेमच्या याचिकेवर केंद्र सरकारला नोटीस

१९९३ मध्ये मुंबईवर झालेल्या बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्या गँगस्टर अबू सालेमने उर्वरित शिक्षा माफ करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
अबू सालेमच्या याचिकेवर केंद्र सरकारला नोटीस
Published on

मुंबई : १९९३ मध्ये मुंबईवर झालेल्या बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्या गँगस्टर अबू सालेमने उर्वरित शिक्षा माफ करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सालेमने २५ वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगला आहे. आता माझी तुरुंगातून सुटका करा, अशी विनंती त्याने केली आहे. त्याच्या याचिकेवर न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली असून प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

अबू सालेमच्या याचिकेवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी सालेमच्या वकिलांनी याचिकेतील विविध मुद्दे खंडपीठाच्या निदर्शनास आणले. भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील प्रत्यार्पण करारानुसार सालेमने २५ वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात घालवू नये. करारामध्ये तसे म्हटलेले आहे.

logo
marathi.freepressjournal.in