नालेसफाई वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस

नालेसफाई वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस

३१ मेपूर्वी ७५ टक्के नालेसफाईचे उद्दिष्ट मुंबई महापालिकेने ठेवले आहे. दोन शिफ्टमध्ये काम करत नालेसफाईचे काम करा, असे आदेश पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी कंत्राटदारांना दिले आहेत. तरीही शहरी भागातील नालेसफाई ३५ टक्के न झाल्याने या कंपनीला पालिकेने नोटीस बजावली असून ७ दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबईत ११ एप्रिलपासून मुंबई शहर व उपनगरात नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली. ३१ मेपूर्वी नालेसफाईचे काम दोन शिफ्टमध्ये करत अधिक मशीनचा वापर करा, असे आदेश आयुक्तांनी कंत्राटदारांना दिले आहेत. मोठ्या नाल्यातील गाळ काढण्यासाठी ७ कंत्राटदार व छोट्या नाल्यातील गाळ काढण्यासाठी २४ वॉर्डात २४ कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. नालेसफाईचे काम वेगाने सुरू असले तरी शहर भागातील वडाळा, वरळी, दादर माहीम, धारावी या भागातील नालेसफाई संथगतीने सुरू असल्याने कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.