मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कुख्यात खंडणीखोर डी. के. रावसह सात आरोपींना अटक केली आहे. एका हॉटेल चालकाला 2.5 कोटींच्या खंडणीची मागणी करून खंडणी न मिळाल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका हॉटेल चालकाला गुंड डी. के. राव आणि त्याच्या अन्य सहा साथीदारांनी 2.5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न मिळाल्यास हॉटेल ताब्यात घेऊन त्याला हॉटेल चालकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार मुंबईतील गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे करण्यात आली होती.
यावर तातडीने कारवाई करत मुंबई पोलिसांनी गुंड डी.के.रावसह त्याच्या सर्व अन्य सहा साथीदारांना अटक केली आहे. भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.