मुंबई : माझ्या वडिलांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांची नजर आता माझ्यावर असून मी त्यांच्या निशाण्यावर आहे. परंतु ते मला घाबरवू शकत नाहीत, कारण माझे वडील एखाद्या सिंहाप्रमाणे जगले, त्यांची सिंहगर्जना आणि त्यांचे रक्त माझ्या धमन्यांमधून वाहत असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी सांगितले.
राष्ट्रवादी पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथील कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी हेही त्यावेळी निशाण्यावर असल्याचे हल्लेखोरांनी चौकशीत सांगितले होते. याप्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.
झिशान सिद्दीकी यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना वाटते की ते जिंकले आहेत. म्हणून त्यांनी आता त्यांच्या नजरा माझ्याकडे वळवल्या आहेत.