आता शिक्षण विभागाचे ‘बँड अॅम्बेसिडर’ म्हणून विद्यार्थी भूमिका बजावणार

विद्यार्थी संख्यावाढीबरोबर शाळांत देण्यात येणाऱ्या सुविधा घरोघरी पोहोचतील, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
आता शिक्षण विभागाचे ‘बँड अॅम्बेसिडर’ म्हणून विद्यार्थी भूमिका बजावणार

मुंबई महापालिकेच्या शाळांतील दर्जा उंचावत असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीवर भर दिला जात आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणारे विविध उपक्रम आता पालिका शाळांतील विद्यार्थी घरोघरी पोहोचवणार आहेत. यासाठी आता शिक्षण विभागाचे ‘बँड अॅम्बेसिडर’ म्हणून विद्यार्थी भूमिका बजावणार आहेत. यामुळे विद्यार्थी संख्यावाढीबरोबर शाळांत देण्यात येणाऱ्या सुविधा घरोघरी पोहोचतील, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांत येणाऱ्या विद्यार्थ्यांची घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. मोफत शालेय वस्तूंचे वाटप, मोफत बेस्ट बस प्रवास यामुळे पालकांचा कल पालिका शाळांकडे वाढला आहे. एप्रिलपासून राबवलेल्या ‘मिशन अ‍ॅडमिशन’मध्ये विद्यार्थीसंख्येत तब्बल एक लाख अडीच हजारांनी वाढ झाल्याने विद्यार्थ्यांची एकूण संख्या चार लाखांवर गेली आहे. पालिका शाळांत देण्यात येणाऱ्या सुविधा, दर्जेदार शिक्षण यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी आता काही विद्यार्थी बँड अॅम्बेसिडरची भूमिका बजावणार असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी दिली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in