Mumbai : आता गुगल मॅपवर BEST बसेसचा रिअल टाइम कळणार; 'असा' करा वापर

बस कुठपर्यंत आली, थांब्यावर येण्यास बसला किती वेळ लागणार, कुठल्या बसला बस थांब्यावर येण्यास उशीर लागणार याची माहिती आता प्रवाशांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
Mumbai : आता गुगल मॅपवर BEST बसेसचा रिअल टाइम कळणार; 'असा' करा वापर
Published on

मुंबई : बस कुठपर्यंत आली, थांब्यावर येण्यास बसला किती वेळ लागणार, कुठल्या बसला बस थांब्यावर येण्यास उशीर लागणार याची माहिती आता प्रवाशांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. बुधवार ७ मे पासून गुगल मॅपवर बेस्ट बसेसची माहिती प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक एस व्ही आर श्रीनिवास यांच्या उपस्थितीत गुगल मॅपचा शुभारंभ केला.

केवळ कोणती बस पकडायची हेच नाही तर त्यांच्या थांब्यावर येणाऱ्या बसची प्रत्यक्ष आगमन वेळ देखील दिसेल. यामुळे अंदाजे प्रवास कालावधी तसेच आणि लक्षणीय विलंबाची सूचनाही प्रवाशांना मिळेल.

लाईव्ह माहितीवर आधारित आगमन वेळा गुगल मॅपवर हिरव्या किंवा लाल रंगात चिन्हांकित केल्या आहेत. बेस्ट उपक्रमाने दिलेल्या माहितीच्या आधारे गुगल मॅप ही माहिती अद्ययावत करेल. बेस्ट आणि गुगल मॅपमधील हे सहकार्य वाहतूक सेवेला बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे फडणवीस म्हणाले.

असा वापरा गुगल मॅप

तुमच्या अँड्रॉइड किंवा आयओएस डिव्हाइसवर गुगल मॅप्स अॅप उघडा. तुमच्या गंतव्य स्थानाची निवड करा आणि 'गो' आयकॉनवर टॅप करा आणि स्त्रोत' आणि ' गंतव्य स्थान' नोंद करा. जर आधीच निवडलेले नसेल, तर हिरव्या किंवा लाल रंगात ठळक केलेली वेळ, बस क्रमांक, मार्ग- प्रत्यक्ष आगमन माहिती पाहण्यासाठी 'सार्वजनिक वाहतूक' पद्धत (छोटा ट्राम आयकॉन) निवडा. शिफारस केलेल्या निकालावर टॅप केल्याने तुम्हाला मार्गाच्या थांब्यांबद्दल अधिक माहिती पाहता येते. तसेच विशिष्ट बसथांबा शोधून बसची प्रत्यक्ष माहिती मिळवणे देखील शक्य आहे. सर्व येणाऱ्या बसेसची यादी पाहण्यासाठी ते आणि त्याचे सूचीबद्ध बस क्रमांक निवडा, स्थान-सक्षम बसेस त्यांची प्रत्यक्ष आगमन वेळ (हिरव्या किंवा लाल दिव्याने दर्शविलेले) प्रदर्शित करतील.

logo
marathi.freepressjournal.in