एनएससीआय अखिल भारतीय स्नूकर खुली स्पर्धा १५ जूनपासून सुरु

 एनएससीआय अखिल भारतीय स्नूकर खुली स्पर्धा १५ जूनपासून सुरु

नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) आयोजित एनएससीआय अखिल भारतीय स्नूकर खुली स्पर्धा १५ जूनपासून एनएससीआयच्या बिलियर्ड्स हॉलमध्ये होणार आहे. २ जुलैपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत सहा लाख ४० हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

एनएससीआय ओपन ही देशातील सर्वात जास्त बक्षीस असलेली स्पर्धा आहे. यंदा विजेत्या खेळाडूला दोन लाख तसेच उपविजेत्याला एक लाख रुपयांचे बक्षीस मिळेल. पात्रता (नॉकआउट) आणि मुख्य फेरी अशा दोन फेऱ्यांमध्ये खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेत ३२ अव्वल स्नूकरपटू सहभागी होतील. त्यात राष्ट्रीय क्रमवारीतील टॉप आठ खेळाडूंचा समावेश असेल. क्‍वॉलिफाइंग राउंड १५ ते २६ जून या कालावधीत होतील. मुख्य फेरीला २७ जूनपासून सुरुवात होईल.

पात्रता फेरीतून १६ क्‍वॉलिफायर्स मुख्य फेरीत प्रवेश करतील. एकूण ३२ खेळाडूंना आठ ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटातील चार खेळाडू राउंड-रॉबिन पद्धतीने एकमेकांशी खेळतील. प्रत्येक ग्रुपमधून प्रत्येकी दोन खेळाडू उपांत्यपूर्व फेरीसाठी (अंतिम १६) पात्र ठरतील. उपउपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व फेरी ३० जूनला होईल. सेमिफायनलचे सामने १ जुलैला रंगतील. महाअंतिम सामना २ जुलै रोजी होईल.

विजेता (दोन लाख रुपये) आणि उपविजेत्यासह (एक लाख रुपये) उपांत्य फेरीतील पराभूत खेळाडूंना प्रत्येकी ३५ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in