एनएसई, चित्रा रामकृष्णसह दंड ठोठावला,डार्क फायबर प्रकरणात सेबीने केली कारवाई

चित्रा रामकृष्ण, वाराणसी आणि सुब्रमण्यम आनंद यांना प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे
एनएसई, चित्रा रामकृष्णसह दंड ठोठावला,डार्क फायबर प्रकरणात सेबीने केली कारवाई
Published on

बाजार नियामक सेबीने नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात एनएसई, चित्रा रामकृष्णसह अन्य १६ जणांना ४४ कोटींचा दंड ठोठावला आहे. त्यात एनएसईचे व्यवसाय विकास अधिकारी रवी वाराणसी, एनएसईचे माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण आणि त्यांचे सल्लागार सुब्रमण्यम आनंद यांचा समावेश आहे. प्रसिद्ध डार्क फायबर प्रकरणात सेबीने ही कारवाई केली आहे.

एनएसई आणि त्यांच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त सेबीने ज्यांना दंड ठोठावला आहे, त्यात स्टॉक ब्रोकर वे टू वेल्थ ब्रोकर, जीकेएन सिक्युरिटीज, संपर्क इन्फोटेनमेंट आणि त्यांचे अनेक कर्मचारी यांचा समावेश आहे.

शेअर बाजार नियामक सेबीने एनएसईला ७ कोटी रुपये, चित्रा रामकृष्ण, वाराणसी आणि सुब्रमण्यम आनंद यांना प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. उर्वरित रक्कम स्टॉक ब्रोकर कंपन्यांवर दंड ठोठावण्यात आली आहे.

नागेंद्र कुमार एसआरव्हीएस आणि देवीप्रसाद सिंग यांना प्रत्येकी एक कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. सेबीने वे टू वेल्थ ब्रोकरला ६ कोटी रुपये, जीकेएन सिक्युरिटीजला ५ कोटी रुपये आणि संपर्क इन्फोटेनमेंटला ३ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सेबीच्या वतीने या संदर्भात मंगळवार, २८ जून रोजी आदेश जारी करून प्रत्येकाला ४५ दिवसांच्या आत दंड जमा करण्यास सांगण्यात आले आहे. डॉर्क फायबर प्रकरणात एनएसईच्या काही अधिकाऱ्यांवर स्टॉक ब्रोकर्सना भेटून गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. सेबीने सविस्तर तपास केल्यानंतर दंड ठोठावण्याची कारवाई केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in