जोगेश्वरीतील असंख्य इमारती धोकादायक!पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्याचे रवींद्र वायकर यांची सूचना

इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतरी करण्यासाठी म्हाडाने ट्रान्झीट कॅम्प द्यावेत, या इमारतींच्या पुनर्विकासासाठी टेंडर काढावे
File photo
File photo

जोगेश्‍वरी येथील पूनमनगर पी.एम.जी.पीच्या इमारती धोकादायक झाल्या आहेत. यंदाच्या पावसाळ्यात इमारतीची पडझड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पी.एम.जी.पीमधील इमारतीच्या दुरुस्तीचे काम करा, अशी सूचना जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांनी म्हाडा प्राधिकरणाला केली होती. वायकर यांच्या सूचनेची दखल घेत धोकादायक इमारतींची दुरुस्ती व डागडुजी करण्याचे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील म्हाडाशी निगडीत विविध प्रलंबित समस्यां सोडविण्यासाठी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी मंगळवारी म्हाडाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्या दालनात बैठक घेतली होती. पूनमनगर येथील पी.एम.जी.पीच्या १७ इमारती अति धोकादायक असून यात सुमारे ९८२ सदनिकाधारक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास विलंब होत असल्याने येत्या पावसाळ्यात वित्त हानी व कुठलीही दुर्घटना घटना घडण्यापूर्वी या अतिधोकादायक इमारतींची डागडुजी म्हाडाने तात्काळ करावी, अशी सूचना वायकर यांनी मांडताच, म्हाडाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी हे काम तात्काळ करावे, असे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले. येथील धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतरी करण्यासाठी म्हाडाने ट्रान्झीट कॅम्प द्यावेत, या इमारतींच्या पुनर्विकासासाठी टेंडर काढावे. टेंडर प्रकियेत प्रतिसाद मिळाला नाही तर, म्हाडानेचे या इमारतींचा पुनर्विकास करावा, अशी आग्रही भूमिका वायकर यांनी यावेळी मांडली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in