कस्तुरबा रुग्णालयात परिचारिकांचे आंदोलन सुरु; महिन्याला आठ साप्ताहिक सुट्यांची मागणी

या आंदोलनात सर्व संवर्गातील कामगार, परिचारिका तसेच परिसेवकांचे प्रश्न अडचणी मांडण्यात येणार आहेत.
कस्तुरबा रुग्णालयात परिचारिकांचे आंदोलन सुरु; महिन्याला आठ साप्ताहिक सुट्यांची मागणी

चार दिवसांपूर्वीच शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. तर गुरुवारी मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील परिचारिका आणि परिसेवकांनी आंदोलन केले. सकाळी सुरू झालेल्या आंदोलनात परिचारिका, परिसेवक सहभागी झाले होते. यावेळी कर्मचारी युनियन संघटनांचे प्रतिनिधी आणि परिचारिका यांनी एफ दक्षिण येथील कार्यालयात जाऊन कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी महिन्याला आठ साप्ताहिक सुट्या मिळाव्यात, अशी मागणी करण्यात आल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सचिव प्रदीप नारकर यांनी सांगितले.

या आंदोलनात सर्व संवर्गातील कामगार, परिचारिका तसेच परिसेवकांचे प्रश्न अडचणी मांडण्यात येणार आहेत. यावर बोलताना नारकर म्हणाले की, “केईएम, नायर, सायन रुग्णालयातील परिचारिकांना आठ साप्ताहिक सुट्ट्या आहेत; मात्र प्रशासनाकडून एका रुग्णालयाला एक तर दुसऱ्या रुग्णालयाला दुसरा न्याय असे का, असा सवाल उपस्थित केला. यात समानता असली पाहिजे.”

दरम्यान, सर्व मनपा सर्वसाधारण रुग्णालये केईएम, नायर, सायन रुग्णालयातील परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांना महिन्याला आठ साप्ताहिक सुट्टी दिल्या जातात, याच धर्तीवर कस्तुरबा रुग्णालयातील परिचारिका यांनादेखील सुट्टी देण्यात याव्यात, या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने येथील परिचारिका आणि परिसेवकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. रोजंदारी कामगारांना दिला जात असलेला मानसिक त्रास व पिळवणूक दूर करून न्याय देण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान यावर तक्ता बनविण्यात येईल अतिरिक्त आयुक्तांना हे सांगण्यात येईल, असे सांगत कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे प्रदीप नारकर यांनी सांगितले. दरम्यान, आंदोलनात म्युनिसिपल मजदुर युनियन, मुंबई सहित, ग्लोबल नर्सिंग युनियन, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना युनियन, मुंबई म्युनिसिपल कामगार संघ युनियन या संघटनेचे नेते उपस्थित आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in