परवानगी नाकारल्याने आजचा OBC मोर्चा रद्द - नवनाथ वाघमारे

मंगळवार, १ सप्टेंबर रोजी निघणारा ‘ओबीसी’ मोर्चा रद्द करण्यात आल्याची माहिती ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिली आहे.
परवानगी नाकारल्याने आजचा OBC मोर्चा रद्द - नवनाथ वाघमारे
परवानगी नाकारल्याने आजचा OBC मोर्चा रद्द - नवनाथ वाघमारे
Published on

मुंबई : मंगळवार, १ सप्टेंबर रोजी निघणारा ‘ओबीसी’ मोर्चा रद्द करण्यात आल्याची माहिती ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिली आहे. मुंबईतल्या आझाद मैदानावर होणाऱ्या मोर्चाला आझाद मैदान पोलिसांनी कायदेशीररीत्या परवानगी नाकारली आहे. याच पार्श्वभूमीवर वाघमारेंनी मोर्चा रद्द करण्याचे आवाहन केले होते.

या मोर्चासाठी राज्यभरातून ओबीसी समाज बांधव सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या परवानगी नाकारल्यानंतर हा मोर्चा कायद्याच्या विरोधात होईल, अशा मोर्चात सहभागी झाल्यास ओबीसी समाजातील गोरगरीब नागरिक आणि नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याचेही वाघमारे म्हणाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in