उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख नियुक्तीवरच आक्षेप शिंदे गटाकडून पुरावे सादर करण्यासाठी १४ दिवसांचा वेळ मागितला

उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख म्हणून नियुक्तीवरच शिंदे गटाकडून आक्षेप घेण्यात आला
उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख नियुक्तीवरच आक्षेप
शिंदे गटाकडून पुरावे सादर करण्यासाठी १४ दिवसांचा वेळ मागितला

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर गुरुवारी पुन्हा एकदा सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. शिंदे गटाच्या वकिलांनी अपात्रतेच्या सर्व याचिकांवर पुरावे सादर करण्यासाठी १४ दिवसांचा वेळ मागितला आहे. अर्थातच, ठाकरे गटाच्या वकिलांनी याला विरोध केला. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख म्हणून नियुक्तीवरदेखील शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. एकीकडे अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड करण्यासाठी बैठक झाल्याचे शिंदे गट रिप्लायमध्ये म्हणतोय तर तोंडी युक्तिवादात मात्र अशी बैठक झाल्याचे अमान्य करतो, हा विनोद असल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर आता वेळापत्रकानुसार सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवादाला सुरूवात केली. त्यांच्याकडून सुमारे दीड तास युक्तिवाद करण्यात आला. सर्व अपात्रतेच्या याचिकांवर पुरावे सादर करण्यासाठी १४ दिवसांचा वेळ शिंदे गटाकडून मागण्यात आला. आमदार अपात्रता प्रकरणी पुरावे सादर करण्याचे ठाकरे गटाचे म्हणणे असले तरी आम्हाला काही पुरावे सादर करायचे असल्याचे शिंदे गटाकडून म्हणण्यात आले. आता अचानक पुरावे सादर करण्यासाठी यांना जाग आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे हे उल्लंघन असल्याचे मत ठाकरे गटाकडून मांडण्यात आले.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख म्हणून नियुक्तीवरच शिंदे गटाकडून आक्षेप घेण्यात आला. २१ जून २०१८ रोजी ही बैठक झाली असल्याचे सांगण्यात येत असले तरी या दिवशी अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला. तसेच राजकीय पक्ष कोण, व्हीप कायद्यानुसार बजावण्यात आला का? तो सगळ्यांना मिळाला का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी पुरावे सादर करावे लागतील, असे शिंदे गटाचे म्हणणे होते.

यांना आताच का जाग आली?

ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना, आताच यांना पुरावे सादर करण्यासाठी जाग आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नवे वेळापत्रक मागितले आहे. राजकीय पक्ष कोणता, हे प्रथमदर्शनी पाहूनच निकाल देण्यात आला पाहिजे. त्यासाठी पुरावे मागण्याची गरजच नाही. उदय सामंत यांची सही असलेल्या दोन याचिकांचा उल्लेख यावेळी करण्यात आला. एका पत्रात ते म्हणतात की, उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत, दुसऱ्यात ते ही बाब नाकारतात. हा काय घोळ आहे, असा सवाल ठाकरे गटाच्या वकिलांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in