शिक्षिकेच्या आई-वडिलांसह मित्रांना पाठवले अश्लील मेसेज-फोटो, बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा; पर्समधून चोरी झाला होता फोन

तक्रारदार तरुणी एका खासगी शाळेत शिक्षिका असून १७ जानेवारीला ती नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना तिचा मोबाईल...
शिक्षिकेच्या आई-वडिलांसह मित्रांना पाठवले अश्लील मेसेज-फोटो, बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा; पर्समधून चोरी झाला होता फोन

मुंबई : लोअर परेल येथे राहणाऱ्या एका २४ वर्षांच्या शिक्षिकेची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या व्यक्तीने तिच्या आई-वडिलांसह मित्रांना काही अश्‍लील मेसेज आणि फोटो पाठविले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

तक्रारदार तरुणी एका खासगी शाळेत शिक्षिका असून १७ जानेवारीला ती नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना तिचा एक मोबाईल पर्समधून चोरीस गेला होता. २९ जानेवारीला तिच्या आई-वडिलांना एका अज्ञात मोबाईलवरून अश्‍लील मेसेज आले होते. त्यात तिच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर होता. अशाच प्रकारे काही अश्‍लील मेसेज तिच्या मित्रांनाही पाठविण्यात आले होते. त्यात तिचे तिच्या मित्रांसोबतचे काही फोटो फॉरवर्ड करण्यात आले होते. तिच्या चोरीस गेलेल्या मोबाईलमधील फोटो अज्ञात व्यक्तीने तिच्या आई-वडिलांसह मित्रांना पाठवून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार उघडकीस येताच तिने घडलेला प्रकार ना. म जोशी मार्ग पोलिसांना सांगितला होता. तिच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ४०३, ५०० भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

logo
marathi.freepressjournal.in