
मुंबई : गोरेगाव पूर्व प्रभाग क्रमांक येथील गोकुळधाम आरे भास्कर मैदानात दीड दिवसांचे बाप्पा ते ११ दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे गोरेगाव पूर्व विभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन या कृत्रिम तलावात करावे, असे आवाहन प्रभाग क्रमांक-५२ च्या भाजपच्या माजी नगरसेविका प्रीती सातम यांनी केले आहे.
१९ सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार असून बाप्पाच्या आगमनाचे जल्लोषात स्वागत केले जात आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घराघरात प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या बाप्पाचे दीड दिवस ते ११ दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन भास्कर मैदानातील कृत्रिम तलावात करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
गोकुळधाम आरे भास्कर मैदानात सर्वच गणेशभक्तांना गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाच्या निर्मितीच्या कामाचा श्रीफळ सातम यांच्या हस्ते वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रभागातील गणेशभक्त नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते