मिठी नदी पात्राच्या रुंदीकरणातील अडथळा दूर; ५०० मीटर परिसर मोकळा; ६७२ बांधकामांवर हातोडा

मिठी नदी पात्राच्या रुंदीकरणातील अडथळा दूर; ५०० मीटर परिसर मोकळा; ६७२ बांधकामांवर हातोडा

मिठी नदीच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या ६७२ झोपड्यांसह अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यात आला.

मुंबई : मिठी नदीच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या ६७२ झोपड्यांसह अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यात आला. २९ फेब्रुवारी व १ मार्चदरम्यान पालिकेच्या 'एच पूर्व' विभागाच्या वतीने करण्यात आली. या कारवाईमुळे मिठी नदीचा सुमारे ५०० मीटर भाग मोकळा झाला असून, नदी पात्राची रुंदी ४० मीटरवरून १०० मीटरवर नेण्याचा अडथळा दूर झाला आहे.

मिठी नदीपात्राचे रुंदीकरण करणे, खोलीकरण करणे, संरक्षक भिंत बांधणे, सेवा रस्त्याचे बांधकाम करणे तसेच छोट्या नाल्यांमधून मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारा सांडपाणी अडवून मुख्य मलनि:सारण वाहिनीमध्ये वळविणे आदी कामे करण्यात येणार आहे. या मुळे मिठी नदीच्या पात्राची रुंदी ४० मीटरवरून १०० मीटर होईल. तसेच मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारे सांडपाणी अडवून अन्यत्र वळविल्यामुळे नदीमध्ये होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासही मदत होईल.

मिठी नदीतील सांडपाण्याचा प्रवाह रोखणे, प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेच्या विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. अंतर्गत मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण करणे, संरक्षक भिंत बांधणे, सेवा रस्ता बांधणे तसेच छोट्या नाल्यांमधून मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारा सांडपाणी अडवून तो मुख्य मलनि:सारण वाहिनीमध्ये वळविणे आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. पालिकेने ऑक्टोबर २०२३ मध्ये बक्षी सिंग कंपाऊंड येथील १०० मीटरचा परिसर मोकळा करून पर्जन्य जलवाहिनी विभागास हस्तांतरित करण्यात आला. सद्यस्थितीत त्या ठिकाणी सुमारे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in