व्हीएन देसाई रुग्णालयात ऑडीओमेंट्रीची चाचणी

या उपचाराचा कानाने ऐकू न येणाऱ्या रुग्णांना फायदा होणार आहे
व्हीएन देसाई रुग्णालयात ऑडीओमेंट्रीची चाचणी
Published on

मुंबई : सांताक्रूझ पूर्व येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात ऐकू न येणाऱ्या रुग्णांसाठी ऑडिओमेट्री चाचणी आणि चाचणीनंतर लागणारे उपचार आणि शस्त्रक्रिया देखील केल्या जाणार आहेत. त्यामुळे कानाने ऐकू न येणाऱ्या रुग्णांना फायदा होणार आहे.

कानांनी ऐकू न येणे, किंवा कमी ऐकू येणे, कमी का ऐकू येते, कोणत्या कारणाने ऐकू येत नाही, कानाच्या पडद्यामुळे, कि हाडांमुळे ही समस्या आहे, हे तपासण्यासाठी ऑडिओमेट्रीची चाचणी केली जाते. कानाला मशीनची गरज आहे की नाही हे तपासण्यासाठी ही इअर टोन ऑडिओमेंट्री चाचणी केली जाते.

गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णालय प्रशासन या विभागासाठी प्रयत्न करत होते' मात्र ही सुविधा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना इतर ठिकाणी पाठवण्याची गरज लागत होती; मात्र अखेर रूग्णालय प्रशासनाच्या प्रयत्नांना यश आले. आणि २४ ऑगस्ट पासून ही रुम कार्यरत झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास ५० नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. पालिकेच्या प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयांसह व्हीएन देसाई रुग्णालयात ही सोय उपलब्ध झाली. या विभागासाठी जवळपास सात जणांची टीम कार्यरत आहे.

एका कॉक्लिअर इंम्प्लांटची किंमत साडेपाच लाखांपर्यंत असते. यासाठी प्रस्ताव तयार करुन पाठवला आहे. सर्व परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण झाली, तर कॉक्लिअर इंम्प्लांट भविष्यात सुरू होईल, असा प्रयत्न राहिल असेही डॉ. त्यागी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in