शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट; तरुणाला अटक

हा प्रकार लक्षात येताच त्याने ओशिवरा पोलीस ठाण्यात मोहम्मद इस्माईलविरुद्ध तक्रार केली होती
शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट; तरुणाला अटक
Published on

मुंबई : शिवाजी महाराज यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी एका २० वर्षांच्या भाजी विक्रेत्या तरुणाला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. मोहम्मद इस्माईल मोहम्मद इसाईल शेख असे या तरुणाचे नाव असून, अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने शहरात विविध ठिकाणी शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याचदरम्यान शाम श्रवणकुमार मिश्रा या तरुणाला सोशल मीडियावर शिवाज महाराज यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह असलेला एक व्हिडीओ दिसला होता. हा व्हिडीओ मोहम्मद इस्माईल शेख याने त्याच्या इंटाग्राम अकाऊंटवरून व्हायरल केला होता. त्यात शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर देऊन नंतर तो व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. हा प्रकार लक्षात येताच त्याने ओशिवरा पोलीस ठाण्यात मोहम्मद इस्माईलविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी मोहम्मद इस्माईला अटक केली होती. याबाबत त्याने पोलिसांकडे माफी मागून यापुढे अशा प्रकारे कुठलेही व्हिडीओ अपलोड करणार नाही, असे सांगितले; मात्र त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असल्याने त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली.

logo
marathi.freepressjournal.in