मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; तरुणाला अटक

पोलिसांनी त्याच्या आयपी ॲॅड्रेसचे लोकेशन शोधून त्याद्वारे त्याला अटक केली.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; तरुणाला अटक

मुंबई : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी कैलास कापडी या तरुणाला सायबर सेल पोलिसांनी अटक केली.

सार्थक कापडी या नावाच्या एक्स हँडलवरून तो भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांना ट्रोल करत होता. पोलिसांनी सांगितले की, कैलास हा दादरच्या वाडिया रोडवर राहतो. त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. कापडी याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याच्या आयपी ॲॅड्रेसचे लोकेशन शोधून त्याद्वारे त्याला अटक केली.

logo
marathi.freepressjournal.in