पेपरविक्री दुकानांना अधिकृत परवाना द्या; महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने राज्य सरकारकडे मुंबईतील वृत्तपत्र विक्रेत्यांना पेपरविक्री करत असलेल्या दुकानाला ठाणे शहराप्रमाणे अधिकृत परवाना (लायसन्स) मिळाला, अशी मागणी केली आहे.
पेपरविक्री दुकानांना अधिकृत परवाना द्या; महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Published on

मुंबई : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने राज्य सरकारकडे मुंबईतील वृत्तपत्र विक्रेत्यांना पेपरविक्री करत असलेल्या दुकानाला ठाणे शहराप्रमाणे अधिकृत परवाना (लायसन्स) मिळाला, अशी मागणी केली आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले असून शासनाने बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या आदेशाने पालिकेच्या अनुज्ञापन खाते यांनी त्वरित मिटिंग घेऊन यांच्या कार्यालयामार्फत अनिल काटे (अनुज्ञापन अधीक्षक-प्र) यांच्या उपस्तिथीत मुंबईतील वृत्तपत्र विक्रेत्यांना महानगरपालिकेकडून परवाना (लायसन्स) मिळण्याबाबत चर्चा झाली.

या चर्चेत महाराष्ट्र राज्य संघटनेचे मुंबईतील प्रतिनिधी दत्ता घाडगे, दीपक गवळी व संजय सातार्डेकर तसेच मुंबईतील अन्य प्रतिनिधी बंटी म्हात्रे, मधू माळकर, विलास जुवळे, संजय सानप, दीपक चव्हाण, बबन बाईत व किशोर येवले हजर होते. चर्चा सकारत्मक झाली असून याबाबत लवकरच निर्णय घेऊ. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सर्वच्या सर्व २४ वॉर्डांना वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई करू नये, असे पत्रक अनिल काटे यांच्या कार्यालयामार्फत देण्यात येणार आहे, असे या बैठकीतील चर्चेत नमूद करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in