पूनम पोळ / मुंबई
मुंबई महापालिकेचे सफाई कामगार १० बाय १० च्या घरात राहतात. ही जागा राहण्यासाठी कमी पडत असल्याने महापालिकेच्या वतीने या निवासस्थानांचा पुनर्विकास करण्यात येत आहे, अशी माहिती आश्रय योजनेचे कार्यकारी अधिकारी अधिकारी अभियंता रमेश गोवारी यांनी दिली. मात्र, या योजनेंतर्गत मिळणाऱ्या घरांवर पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही हक्क दाखवला असल्याने आश्रय योजनेतंर्गत कामगारांना मिळणाऱ्या घरकुल योजनेचा लाभ २८०० कर्मचाऱ्यांना घेता येणार नाही, असा आरोप म्युनिसिपल मजदूर युनियनने केला आहे. तर हे अधिकारी सफाई खात्यातील वरिष्ठ कमर्चारी असल्याचा दावा गोवारी यांनी केला आहे.
पालिकेतील घनकचरा विभागात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना आश्रय योजनेंतर्गत राहण्यासाठी घरे उपलब्ध करून पालिकेच्या वतीने पुनर्वसन केले जाते. मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागात सुमारे २७ हजार ९९२ कर्मचारी सद्यस्थितीत कार्यरत आहेत. यापैकी ५५९२ कर्मचाऱ्यांना मुंबईत विविध भागात असलेल्या ४६ वसाहतींमध्ये निवासस्थाने देण्यात आली आहेत. मात्र एकूण कामगारांच्या तुलनेत केवळ १५ टक्के कर्मचाऱ्यांना पालिकेच्या वतीने ही घरे मिळाल्याने इत्तर कामगार या घरांसाठी आग्रही आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेत पालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी आश्रय योजनेंतर्गत पुनर्विकास प्रकल्प राबवण्यात येत आहे. पालिकेने या वसाहतींचे दहा गट केले आहे. यासाठीचे काम स्कायलाइन डेव्हलपर्सला देण्यात आले आहे. तर डिझाईन आणि बिल्ड टर्नकी तत्त्वावर विश्वासाहतींचा पुनर्विकास प्रकल्प आश्रय योजनेअंतर्गत सुरू झाला आहे. दरम्यान काम सुरू झाल्यापासून अठरा महिन्यांत हा प्रकल्प मार्गी लागणार होता. या कामाचे देकार पत्र २०२२ मध्ये देण्यात आले. मात्र अद्यापही प्रकल्प जैसे थे च्याच परिस्थितीत आहे.
सफाई कामगारांसाठी असलेल्या या वसाहतीमध्ये १० हजार ७१८ कामगारांना ३०० चौरस फुटाची घरे उपलब्ध होत आहेत. तर अधिकाऱ्यांसाठी ६०० चौरस फुटाची १४०० घरे बांधण्यात आली आहेत. ही योजना केवळ सफाई कामगारांसाठी आहे. तर यापूर्वी कोणतेही अधिकारी सफाई कामगारांच्या १० बाय १० च्या घरात राहत नव्हते. किंवा त्याठिकाणी फिरकतही नव्हते. मात्र, आता ऐन मोक्याच्या जागेवर घरे मिळत असल्यामुळे विविध विभागातील अधिकारी या घरांवर हक्क गाजवत आहे. असा आरोप मुनिसिपल मजदूर युनियनचे चिटणीस सुहास खामकर यांनी केला आहे. तर या संदर्भात गोवारी यांना विचारले असता हे अधिकारी सफाई खात्यातच कनिष्ठ पर्यवेक्षक दर्जाचे असल्याचे गोवारी यांनी सांगितले.
डिझाईन आणि बिल्ड टर्नकी तत्त्वावर कामे सुरू झालेली ठिकाणे
राजवाडकर स्ट्रीट , वालपाखाडी, ६४ जेल रोड, ४२जेल रोड, टँक पाखाडी, सिद्धार्थ नगर, शिश महल इमारत, सरदार नगर, कल्पक प्लॉट, माहीम प्लॉट, यारी रोड, प्रगती नगर, मिठा नगर, जे.पी. नगर, आकुर्डी रोड, बाभई नाका, वामनवाडी, सिंधी सोसायटी, पी.एल. लोखंडे मार्ग, चिराग नगर आणि आम्रपाली बिल्डिंग या ठिकाणी कामे सुरू असल्याची माहिती गोवारी यांनी दिली. तर पालिकेच्या सफाई कामगारांनी पी.जी. सोलंकी नगर, गौतम नगर
(टप्पा दोन), जुहू गल्ली, हासनाबाद लेन, देवनार संक्रमण शिबीर, कुर्ला लाईन्स गार्डन या ठिकाणी पुनर्विकासाला विरोध केला असल्याने हे प्रकल्प सुरू होऊ शकले नाहीत, असेही गोवारी यांनी सांगितले.