मोठी बातमी! जुन्या पेन्शनवरून सुरु असलेला संप मागे; मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा यशस्वी

गेल्या ७ दिवसांपासून जुनी पेन्शन योजनेवरून सुरु असलेला संप अखेर मागे घेतला असून मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले
मोठी बातमी! जुन्या पेन्शनवरून सुरु असलेला संप मागे; मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा यशस्वी
Published on

गेले ७ दिवस सुरु असलेला बेमुदत संप अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मागे घेतल्याची माहिती संपकऱ्यांच्या वतीने समन्वयक विश्वास काटकर यांनी माध्यमांना दिली. त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, उद्यापासून सर्वांना कामावर रुजू होण्याचे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले आहे.

संपकऱ्यांच्या वतीने समन्वयक विश्वास काटकर यांनी पत्रकारांना सांगितले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. ३ महिन्यांमध्ये राज्य सरकार मागण्या पूर्ण करेल," असे आश्वासन सरकारने कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिलेले आहे. त्यामुळे उद्यापासून संप मागे घेत असल्याचीही घोषणा त्यांनी यावेळी केली.

logo
marathi.freepressjournal.in