J J Hospital : जे.जे. रुग्णालयात चालता चालता सापडला तब्बल १३० वर्ष जुना भुयारी मार्ग!

जे. जे. रुग्णालयात (J J Hospital) तब्बल १३० वर्ष जुन्या असलेल्या या इमारतीच्या आवारात सापडलेला हा भुयारी मार्ग २०० मीटरचा असून तो प्रसूती विभाग ते लहान मुलांच्या विभागापर्यंत आहे.
J J Hospital : जे.जे. रुग्णालयात चालता चालता सापडला तब्बल १३० वर्ष जुना भुयारी मार्ग!

मुंबईतील भायखळा येथील जे. जे. रुग्णालय (J J Hospital) हे मुंबईतील सर्वात सुप्रसिद्ध रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या डी.एम.पेटीट या इमारतीखाली भुयारी मार्ग सापडला आहे. ही इमारत १८९२ साली बांधण्यात आली होती. त्यामुळे हा भुयारी मार्ग १३० वर्ष जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालय प्रशासनाने या भुयारी मार्गाची जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती दिली असून पुरातत्व विभागाकडूनही या भुयारी मार्गाची पहाणी होणार आहे.

जे. जे. रुग्णालयात तब्बल १३० वर्ष जुन्या असलेल्या या इमारतीच्या आवारात सापडलेला हा भुयारी मार्ग २०० मीटरचा असून तो प्रसूती विभाग ते लहान मुलांच्या विभागापर्यंत आहे. रुग्णालयाची तपासणी करत असताना डॉ.अरुण राठोड यांना हा भुयारी मार्ग आढळला. त्यानंतर त्यांनी या सुरक्षारक्षकांच्या सहाय्याने भुयारी मार्गाची पूर्ण तपासणी केली.

जे. जे. रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांनी यावेळी सांगितले की, सुरुवातीला या इमारतीमध्ये महिला आणि मुलांवर उपचार करणासाठी वैद्यकीय वॉर्ड म्हणून वापरली जात. आता त्याचे नर्सिंग कॉलेजमध्ये रूपांतर झालेले आहे. इमारतीच्या परिसरात भुयारी मार्ग असल्याची आम्हाला कल्पना होती. परंतु, तो नक्की कुठे आहे हे आम्हाला माहिती नव्हते. आता या भुयाराचे एक बाजू सापडली असून दुसरा मार्ग कोणत्या बाजूस उघडतो, त्याचा शोध घ्यावा लागणार आहे. याबाबत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयालाही माहिती दिली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in