जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत ओम साईश्वर सेवा मंडळाने पटकावले विजेतेपद

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत ओम साईश्वर सेवा मंडळाने पटकावले विजेतेपद

इन्स्पायर फाऊंडेशनतर्फे आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत (१६ वर्षांखालील) मुलींच्या गटात ओम साईश्वर सेवा मंडळ, तर मुलांच्या गटात विद्यार्थी क्रीडा केंद्र-अ संघाने विजेतेपद मिळवले.

मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर, माहीम येथे झालेल्या या स्पर्धेतील मुलींच्या अंतिम सामन्यात ओम साईश्वर मंडळाने शिवनेरी सेवा मंडळाचा १०-५ असा एक डाव आणि पाच गुणांनी पराभव केला. रश्मी दळवीने (४.२० मिनिटे संरक्षण आणि आक्रमणात ४ गडी) ओम साईश्वरसाठी अष्टपैलू भूमिका बजावली. निर्मिती परब (२.५० मि., १ गडी), अथश्री तेरवणकर (१.५० मि., २ गडी) यांनी तिला उत्तम साथ दिली. पराभूत संघाकडून भूमी सोलंकी (४.१० मि.) आणि अनुष्का गौड (१ गडी) यांनी कडवी झुंज दिली.

मुलांच्या अंतिम सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्र-अ संघाने यजमान ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर संघावर ९-६ अशी तीन गुणांच्या फरकाने सरशी साधली. विद्यार्थी संघासाठी जर्नादन सावंत (नाबाद ६ मि., २ गडी), अथर्व पालव (२.४० मि. आणि २ गडी) आणि आदेश घाडीगावकर (४.५० मि., २ गडी) या त्रिकुटाने मोलाचे योगदान दिले. ओम समर्थ संघासाठी स्वयम साळवी (५ मि.), श्रेयस सौंदळकर (४.१० मि., १ गडी) यांनी कडवा प्रतिकार केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in