ओमायक्रॉन विषाणुचा धोका कायम; मुंबईत १०० टक्के रुग्ण

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला त्यानंतर कोरोनाचे नवीन व्हेरिएंट समोर आले आहेत.
ओमायक्रॉन विषाणुचा धोका कायम; मुंबईत १०० टक्के रुग्ण

कोरोनावर मात करण्यात यश आले असताना कोरोनाचा उपप्रकार ओमायक्रॉन विषाणुचा धोका कायम आहे. जिनोम सिक्वेन्सिंगचा १४वा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून २३० नमुन्यांची तपासणी केली असता २३० नमुने ओमायक्रॉनचे आढळले आहेत. दरम्यान, ४३ वर्षीय व्यक्तीचा ओमायक्रॉनची लागण झाल्यानंतर मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला त्यानंतर कोरोनाचे नवीन व्हेरिएंट समोर आले आहेत. ओमायक्रॉन हा कोरोनाचाच उप प्रकार असून कोरोनाची चौथी लाट रोखण्यात पालिकेला यश आले असले तरी ओमायक्रॉनचे टेंशन कायम आहे. २३० बाधितांपैकी, ७४ जणांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. पैकी, १९ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील तिघांना अतिदक्षता उपचारांची गरज भासली. तर एका पुरुष रुग्णाचा मृत्यू ओढवला. ज्या रुग्णाचा मृत्यू ओढवला, त्याचे वय ४३ वर्षे होते. तसेच तो मधुमेह व हृदयविकाराने त्रस्त होता. लक्षणे गंभीर होऊ लागल्यानंतर तीन दिवसांनी त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in