मुंबई : मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांना त्यांच्या आवारात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे तसेच सुक्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करणे सुलभ व्हावे, यासाठी त्रयस्थ-पक्षकार एजन्सींची नियुक्ती करण्यात येणार आहे.
२० हजार चौरस मीटर किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळाची इमारत, अधिक पाणी वापरणारी आस्थापना अथवा दररोज १०० किलो किंवा त्याहून अधिक घनकचरा निर्माण करणारी आस्थापना घाऊक कचरा उत्पादक म्हणून गणली जाते. हॉटेल, रुग्णालये, शाळा-महाविद्यालये, कार्यालये, व्यावसायिक आस्थापना आदींचा समावेश होतो.
कचरा घाऊक निर्माण करणाऱ्यांनी ओला कचरा परिसरातच कंपोस्टिंग, बायोमिथेनेशन किंवा मान्यताप्राप्त अन्य तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. कचरा प्रक्रिया यंत्रणा उभारणे बंधनकारक केले. आस्थापनांना जागेअभावी अथवा अन्य कारणांमुळे अशी व्यवस्था करणे शक्य नसल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेकडून सूट घेऊन संबंधित जबाबदारीनुसार प्रमाणपत्र घेण्याची तरतूद आहे.