गणेशोत्सवानिमित्त पश्चिम रेल्वेवरुन कोकणासाठी विशेष गाड्या सोडणार

गाडी क्रमांक ०९००१ आणि ०९००२ च्या मुंबई सेंट्रल ते ठोकूर सहा विशेष फेरी होणार आहेत.
गणेशोत्सवानिमित्त पश्चिम रेल्वेवरुन कोकणासाठी विशेष गाड्या सोडणार

गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वेने मुंबई, अहमदाबाद, उधना येथून कोकणसाठी ६० विशेष फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचे आरक्षण १८ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

यामध्ये गाडी क्रमांक ०९००१ आणि ०९००२ च्या मुंबई सेंट्रल ते ठोकूर सहा विशेष फेरी होणार आहेत. २३ आणि २४ ऑगस्टपासून या फेऱ्यांना सुरुवात होईल. तर गाडी क्रमांक ०९००३ आणि ०९००४ च्या मुंबई सेन्ट्रल ते मडगाव ३४ विशेष फेऱ्या होतील. या फेऱ्याही २४ ऑगस्टपासून होणार आहेत. याशिवाय वांद्रे टर्मिनस ते कुडाळ सहा फेऱ्या, उधना ते मडगाव सहा फेऱ्या, अहमदाबाद ते कुडाळ चार फेऱ्या आणि विश्वमित्री ते कुडाळ चार फेऱ्या होणार आहेत.

मध्य रेल्वेद्वारे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मंगळुरू जंक्शनदरम्यान अतिरिक्त गणपती विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने यापूर्वीच १९८ गणपती विशेष चालवण्याची घोषणा केली आहे आणि त्यामुळे यावर्षी एकूण गणपती विशेषची संख्या २०६ होणार आहे.

यामध्ये गाडी क्रमांक ०११६५ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर (४ सेवा)पर्यंत दर मंगळवारी मध्यरात्री १२.४५ वाजता सुटेल आणि मंगळुरू जंक्शन येथे त्याच दिवशी संध्याकाळी ७.३० वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०११६६ विशेष १६ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर (४ सेवा)पर्यंत दर मंगळवारी मंगळुरू जंक्शन येथून रात्री १०.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता पोहोचेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in