गुरुपौर्णिमेनिमित्त एकनाथ शिंदे यांच्या कडून बाळासाहेब ठाकरे व दिघेंच्या स्मृतींना वंदन

सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडून येईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला
गुरुपौर्णिमेनिमित्त एकनाथ शिंदे यांच्या कडून बाळासाहेब ठाकरे व दिघेंच्या स्मृतींना वंदन

गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ तसेच ठाण्यातील टेंभीनाका येथे असणारे आनंद दिघे यांच्या आनंदाश्रम येथे जाऊन दोघांच्या स्मृतींना वंदन केले. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करीत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार आम्ही काम करतोय, जेणेकरून सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडून येईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यात सत्तांतर झाले. मुख्यमंत्रिपदाचा मान एकनाथ शिंदे यांना मिळाला. शिवसेनेत बंड करताना तसेच मुख्यमंत्री झाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी कायम आम्ही बाळासाहेब व आनंद दिघे या दोघांच्या हिंदुत्वाच्या विचारांवर चालणार असल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर आजची पहिलीच गुरुपौर्णिमा होती. या दिवशी एकनाथ शिंदे यांनी आपल्या दोन्ही गुरूंच्या स्मृतींना वंदन केले. गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना वंदन केले. या दोघांची शिकवण आचरणात आणून सामान्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील. राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in